क ा जीव तुझ्यासाठी तोळा-तोळा झुरतो, हे आहे ‘तू ही रे’मधील नवीन गाणं. हे गाणं रिलीज होऊन तसे काही दिवसच झाले आहेत. पण या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत आहे. ‘तू ही रे’ या सिनेमातील सर्वच गाणी सोशल मीडियात चांगलीच लोकप्रिय होत असून याच सिनेमातील तोळा-तोळा हे गाणं मात्र प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस पडत आहे. स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळते. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमाची चर्चा हा सिनेमा रिलीज होण्याआधीच रंगली आहे आणि त्याबरोबरच सिनेमातील सर्वच गाणी हिट ठरली असून स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या वेगळ्या लूकचीही प्रशंसा होत आहे. याच सिनेमातील सुंदरा, गुलाबाची कली ही गाणी आधीच सुपरहिट ठरली असून त्यात आता हे गाणंही लोकप्रियता मिळवत आहे.
‘तोळा-तोळा’ला प्रेक्षकांची पसंती
By admin | Updated: August 29, 2015 02:50 IST