सध्या बॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता अतुल कुलकर्णीदेखील एका आगामी बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहेत. द गाझी अटॅक असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले आहे. नुकताच द गाझी अटॅक या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात १९७१ मध्ये म्हणजेच भारत-पाकिस्तानाच्या युद्धा अगोदरची कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी यांनी कार्यकारी अधिकारी देवराज एस २१ इंडियन नेव्ही यांची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णीबरोबर या चित्रपटात राणा दग्गुबती, तापसी पन्नू, के के मेनन, राहुल सिंग आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत.
अतुल दिसणार एक वेगळ्या भूमिकेत
By admin | Updated: January 14, 2017 06:45 IST