स्टार व्हॉइस आॅफ इंडिया, छोटे उस्ताद या रिअॅलिटी शोमधून नावारूपाला आलेली बंगाली गायिका आश्लेषा हिने आपल्या सुरेख आवाजाने बॉलीवूडदेखील गाजवले. इतक्या लहान वयात केलेले कार्य पाहता, खरंच कौतुकास्पद आहे. आश्लेषाने बॉलीवूडमध्ये गोलमाल रिटर्न्स, डेंजरस इश्क, रांझणा, कांची द अनब्रेकेबल, रिव्हॉल्व्हर राणी, प्रेम रतन धन पायो या बिग बजेट चित्रपटांनादेखील आपला आवाज दिला आहे. आता हीच तगडी गायिका तुझ्याविना या गाण्यामार्फत मराठीत पदार्पण करीत आहे. या गाण्याला संगीतकार प्रसाद फाटक यांनी संगीत दिले आहे. तुझ्याविना हे एक रोमँटिक गाणे असून पूनम घाडगे, चेतन मोहुतरे यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. आश्लेषाचे हे गाणे ऐकण्यास आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागणार, हे नक्की.
आश्लेषाचे मराठीत पदार्पण...
By admin | Updated: April 9, 2016 02:31 IST