Join us  

आर्शी खान थिरकणार बिपाशा बासूच्या गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 2:22 PM

आर्शी आता आपल्या धमाकेदार नृत्याने स्क्रीन अधिक बहारदार करण्यासाठी सज्ज आहे.

ठळक मुद्देबिडी जलाईले’ या गाण्यालक आर्शी नृत्य करणार आहे

&TVवरील बिट्टी बिझनेसवाली ही मालिका सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. या मालिकेतील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य या विषयाला बरीच लोकप्रियता लाभत आहे आणि बिट्टी-माहीसुद्धा प्रेक्षकांचे फारच लाडके झाले आहेत. या मालिकेत अभिषेक बजाज साकारत असलेला माही आणि बिट्टीची (प्रकृती मिश्रा) ही आगळीवेगळी प्रेमकहाणी आहे. मालिकेत सध्या माही आणि बिट्टी जबरदस्तीने एकमेकांशी बांधले जात आहेत! हो, तुम्ही ऐकताय ते खरंच आहे! या दोघांच्या दोन्ही कुटुंबांमध्ये कमालीचा कटूपणा आहे, या दोन्ही प्रेमीजीवांमध्ये तशीच परिस्थितीही उप्तन्न झालीये. आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माही बिट्टीला लग्नासाठी तयार करतो. येत्या आठवड्यात या जोडप्यामधील दुही पाहायला मिळणार आहे, आणि या सगळ्याचा बिट्टीच्या आयुष्यावरील प्रचंड परिणामही पाहता येणार आहे. ही धोक्याची सूचना आहे जणू. आता या दोघांच्या लग्नामुळे मालिकेतील नाट्य अधिक वरच्या पातळीवर जाणार आहे. या मोठ्या आनंदोत्सवात धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे, रिअॅलिटी टीव्हीवरील खळबळजनक व्यक्तिमत्त्व आर्शी खान. ओमकारा सिनेमात बिपाशा बासूवर चित्रित करण्यात आलेल्या `बिडी जलाईले’ या गाण्यालक आर्शी नृत्य करणार आहे.

आर्शी आता आपल्या धमाकेदार नृत्याने स्क्रीन अधिक बहारदार करण्यासाठी सज्ज आहे. चकाकत्या निऑन पीच स्पगेटीवर विरोधी रंगातील रॉयल ग्रीन आणि सोनेरी स्कर्ट असा पेहराव केलेली ही अभिनेत्री, प्रेक्षकांना अचंबित करेल अशा सर्वोत्तम तडफदार स्टेप्स सादर करणार आहे. या नृत्याविष्कारात बॉलिवुडचा चमकदार टच देण्यासाठी आर्शी नृत्य करत असताना स्पार्कलिंग लाइट्स दिले जाणार आहेत, तसेच तिचे नृत्य अधिक चांगले होण्यासाठी खास भारतीय खटिया’ दिली जाणार आहे.

आर्शीचे नृत्यातील कौशल्य सर्वोत्तम आहेच, शिवाय तिच्या चेहऱ्यावरील अॅटिट्यूडमुळे ती प्रत्येक वेळी अग्रेसर असल्याचे भासते. आपल्या नृत्यामुळे प्रेक्षक बेहोष व्हावेत, असे सांगणारी आर्शी म्हणते, ''माझ्या नृत्यासाठी प्रचंड प्रतिक्रिया आल्या. बिट्टी बिझनेसवाली मालिकेची संकल्पना तर मला खूपच आवडली आहे, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य या विषयाशी मीसुद्धा स्वतःला जोडू शकते. बॉलिवुडमध्ये `बिडी जलाईले’ या गाण्याचं एक स्थान निर्माण झालेलं आहे. मीसुद्धा या नृत्याच्या प्रक्षेपणासाठी अतिशय उत्सुक आहे. बिपाशाने साकारलेल्या गाण्याची तुलना होऊच शकत नाही. नृत्यदिग्दर्शक हबिबाजी यांनी या गाण्याला एक उत्सवाचा आणि थोडासा गावंढळ असा नवा बाज चढवला आहे. या मालिकेतील माझा परफॉर्मन्स प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी मला आशा वाटते.’’ ती पुढे म्हणाली, ''आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमपणे घर चालवतात, पण करिअरला थोडंसं मागे टाकतात, खासकरून लग्नानंतर हे केलं जातं. बिट्टी बिझनेसवालीमध्ये याच रुढीबद्धतेला छेद दिला जातो आहे आणि स्वतंत्र असण्याचं महत्त्व अधोरेखित केलं जात आहे. मला नेहमीच असं वाटतं, की महिलांनी स्वतःसाठी कमवावं, हे जितक्या लवकर होईल, तितकं स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवता येईल.'' आर्शीचा तडकता फडकता परफॉर्मन्स पाहण्यासाठी फारच उत्सुक आहात ना! 

टॅग्स :अर्शी खानबिपाशा बासू