Join us

अर्पिताला मिळाली प्रियंकाची साथ

By admin | Updated: November 21, 2014 00:13 IST

सलमान खानची बहीण अर्पिता खानने लग्नासाठी एक लहानसे भाषण लिहिले होते. पण ती भावुक झाली आणि ते भाषण वाचण्याची हिंमत करू शकली नाही

सलमान खानची बहीण अर्पिता खानने लग्नासाठी एक लहानसे भाषण लिहिले होते. पण ती भावुक झाली आणि ते भाषण वाचण्याची हिंमत करू शकली नाही. ती प्रियंकाच्या जवळ गेली आणि तिच्यातर्फे हे भाषण वाचून दाखवायची विनंती तिला केली. प्रियंकाने स्टेजवर जाऊन तिच्या वतीने भाषण वाचून दाखविले, ‘मी खूप भाग्यवान मुलगी आहे. कारण मला अशा कुटुंबाची साथ मिळाली. सोहेलभाई माझ्या मित्रासारखा आहे. अरबाजभाई माझा मार्गदर्शक आहे, तो मला नेहमी सांगत असतो की, काय करायला हवे आणि काय नको. सलमान भाईचे मन मोठे आहे. त्याच्यासाठी मी कधीही काहीही चुकीचे करू शकत नाही.