बॉलीवूडमधील आघाडीची दिग्दिर्शका फराह खानच्या संगीत सोहळ्यावेळी कॅमे-यात कैद झालेला बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत फराह खान बॉलीवूडचा स्टार अभिनेता ऋ तिक रोशनसोबत दिसत आहे. या फोटोत दिसणारी दुसरी व्यक्ती ही अर्जुन कपूर आहे. मात्र अर्जुनच्या चाहत्यांनाही हा फोटो ओळखता येणार नाही़ माझ्या संगीत सोहळ््यात १० वर्षांपूर्वीचा अर्जुनचा फोटो़ मी वजन कमी करण्याबाबत त्याला बोलले आहे. प्रशंसा म्हणून स्वीकार, असे फराहने म्हटले आहे.
अर्जुनचा तो फोटो व्हायरल
By admin | Updated: February 27, 2015 23:19 IST