Join us

अनुष्का शेट्टी 'रुधर्मादेवी'च्या अवतारात

By admin | Updated: September 2, 2015 16:58 IST

बहुचर्चित 'बाहुबली' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी आता 'रुधर्मादेवी'च्या अवतारात दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बहुचर्चित 'बाहुबली' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी आता 'रुधर्मादेवी'या चित्रपटात मोठी भूमिका साकारताना दिसणार आहे. 
दिग्दर्शक गुणाशेखर यांचा आगामी चित्रपट 'रुधर्मादेवी' येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत म्हणजेच 'रुधर्मादेवी'च्या अवतारात दिसणार आहे. अनुष्कासोबतच अभिनेता राणा दग्गुबती आणि अल्लु अर्जुन यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहेत. 
हा चित्रपट  तिस-या शतकातील काकतीय राजघराण्यातील महाराणी 'रुधर्मादेवी' हिच्या जीवनावर आधारीत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बाहुवली' या चित्रपटानंतर आता 'रुधर्मादेवी' हा सुद्धा चित्रपट तशाच आशयाच्या कथेवर अलंबून असल्याचे समजते. 
 'रुधर्मादेवी' हा चित्रपट ९ ऑक्टोबरला तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे.