Join us

अनुष्का म्हणते, मी प्रामाणिक

By admin | Updated: July 31, 2015 09:30 IST

अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणते, ‘सध्या मी ज्या पातळीवर उभी आहे हा माझ्या करिअरचा अत्युच्च टप्पा आहे.’ ‘रब ने बना दी जोडी’ तून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणते, ‘सध्या मी ज्या पातळीवर उभी आहे हा माझ्या करिअरचा अत्युच्च टप्पा आहे.’ ‘रब ने बना दी जोडी’ तून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी अनुष्का शर्मा आता तिने मिळविलेल्या यशाचा आनंद लुटत आहे. तिच्या या यशाचे गमक म्हणजे ती स्वत:चा प्रामाणिकपणा समजते. अनुष्का म्हणते, ‘माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणाला खूप महत्त्व आहे. व्यक्तीने प्रामाणिक असणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे सर्व मला शक्ती देते. मी स्वत:ला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत समजते. कारण माझ्यात लपवण्यासारखे काहीच नाही.’