Join us  

'आंखे निकालकर गोटियां खेलूंगा', शक्ती कपूरने सांगितला व्हायरल संवादामागचा मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 3:51 PM

Shakti Kapoor : 'अंदाज अपना अपना' म्हणजे ज्यातील प्रत्येक पात्र संस्मरणीय आहे. अमर, प्रेम, करिश्मा, रवीना, तेजा, श्याम, गोपाल, क्राइम मास्टर गोगो, अगदी रॉबर्ट ही सर्व पात्रं प्रेक्षकांना खूप भावली. आता, चित्रपटाला रिलीज होऊन ३० वर्ष उलटल्यानंतर, स्वत: शक्ती कपूर यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल मनोरंजक खुलासे केले आहेत.

१९९४ साली रिलीज झालेला क्लासिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'(Andaj Apna Apna)चं नाव जरी कुणी घेतलं तरी डोळ्यासमोर त्यातील पात्रं उभी राहतात. राजकुमार संतोषी यांचा हा असा चित्रपट आहे जो कितीही वेळा पाहिला तरी त्यातील पात्र आपल्याला खळखळून हसायला भाग पाडतात. यात आमिर खान, सलमान खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांचा हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र काही वर्षानंतर हा चित्रपट सर्वांचा आवडता कॉमेडी सिनेमा बनला. या चित्रपटातील डायलॉग्स असो किंवा अतरंगी अंदाज सर्व दमदार आहे. विशेष करून यातील गुंडा क्राइम मास्टर गोगो. शक्ती कपूर(Shakti Kapoor)ने या भूमिकेला योग्य न्याय दिला. पण तुम्हाला हे कळल्यावर हैराण व्हाल की, या भूमिकेसाठी शक्ती कपूर पहिली पसंती नव्हते.

'अंदाज अपना अपना' म्हणजे ज्यातील प्रत्येक पात्र संस्मरणीय आहे. अमर, प्रेम, करिश्मा, रवीना, तेजा, श्याम, गोपाल, क्राइम मास्टर गोगो, अगदी रॉबर्ट ही सर्व पात्रं प्रेक्षकांना खूप भावली. आता, चित्रपटाला रिलीज होऊन ३० वर्ष उलटल्यानंतर, स्वत: शक्ती कपूर यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल मनोरंजक खुलासे केले आहेत. 'डिजिटल कॉमेंटरी'ला दिलेल्या एका मुलाखतीत शक्ती कपूर यांनी सांगितले की, ७० टक्के शूटिंग पूर्ण झाल्यावर मी या चित्रपटात सहभागी झालो.

शक्ती कपूर नाही, हा अभिनेता बनणार होता 'क्राइम मास्टर गोगो'या चित्रपटात सुरुवातीला टिनू आनंद यांना क्राइम मास्टर गोगोची भूमिका साकारणार असल्याचे शक्ती कपूर यांनी सांगितले. मात्र शूटिंग सुरू असताना टिनू परदेशात असल्यामुळे ते वेळेवर भारतात परत येऊ शकणार नव्हते. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी शक्ती कपूर यांच्याशी संपर्क साधला. ते देखील जवळच दुसर्‍या चित्रपटाचे शूटिंग करत होते.

शक्ती कपूर यांची अशी झाली एन्ट्रीशक्ती कपूर म्हणाले, 'जेव्हा मी चित्रपटात सहभागी झालो तेव्हा जवळपास ७० टक्के शूटिंग पूर्ण झाले होते. मात्र, मला राजकुमार संतोषींसोबत काम करायचे होते आणि चित्रपटाचा निर्माता माझा मित्र होता. पण मलाही तारखेची अडचण होती कारण त्याला चित्रपटाचे शूटिंग तीन दिवसांत पूर्ण करायचे होते. त्याने मला पुन्हा पुन्हा विनंती केली. मग मी एक सूचना केली की चित्रपटातील इतर कलाकारांनी सहकार्य केल्यास ते रात्री शूटिंग करू शकतात.

असा शोध लागला 'आंखे निकाल के गोटियां खेलूंगा' डायलॉगचाशक्ती कपूर यांनी पुढे सांगितले की, कसेबसे चित्रपटातील कलाकार रात्री शूटिंग करायला तयार झाले. त्यांनी सांगितले की, यानंतर त्यांनी टिनू आनंद यांच्याशीही बोलून आपली भूमिका साकारल्यास काही अडचण असेल का, असे विचारले. शक्ती म्हणाले की, 'टिनू माझा खूप चांगला मित्र आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या संमतीशिवाय मी ही भूमिका करू शकत नव्हतो. सुदैवाने त्यांची हरकत नव्हती.' या अभिनेत्याने मुलाखतीत पुढे सांगितले की, चित्रपटातील क्राइम मास्टर गोगोचा विचित्र ड्रेस आणि 'आंखे निकाल के गोटियां खेलूंगा' हा लोकप्रिय संवाद, या दोन्ही गोष्टी टिनू आनंदचे योगदान आहेत.

विमानतळावर आमिर खानला भेटल्याचा किस्सा सांगितलाशक्ती कपूर यांनी सांगितले की, क्राइम मास्टर गोगोची भूमिका इतकी लोकप्रिय झाली आहे याची मला कल्पना नव्हती. ते म्हणाले की की बऱ्याच वर्षांनी ते आमिर खानला आंतरराष्ट्रीय विमानतळावर भेटले. तिथे आमिरने त्यांना सांगितले की तो क्राइम मास्टर गोगो-थीम असलेला टी-शर्ट शोधत आहे. शक्ती कपूर आश्चर्यचकित झाले कारण त्यांना माहित नव्हते की या पात्राच्या थीमवर आधारित टी-शर्ट देखील उपलब्ध आहेत.

टॅग्स :शक्ती कपूरआमिर खानशाहरुख खान