Join us

..तर सलमान शेतकरी बनणार

By admin | Updated: July 22, 2014 23:33 IST

सध्या ‘किक’च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या सलमान खानने नुकतेच मीडिया फोटोग्राफर्सना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

सध्या ‘किक’च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या सलमान खानने नुकतेच मीडिया फोटोग्राफर्सना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर फोटोग्राफर्सनी सलमानचे बॉयकॉट केले होते. असे असताना अजूनही सलमान त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे; पण जर मीडियाने सलमानवर बहिष्कार घातला, तर सलमान काय करेल? असा प्रश्न जेव्हा त्याला विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला की, ‘माङयाकडे पनवेलला एक शेत आहे. मी त्या शेतात मका आणि बटाटय़ाची शेती करेल. लोक जेव्हा माझा चित्रपट पाहायला येतील, तेव्हा मी माङयाच शेतातील मक्यापासून बनवलेले पॉपकॉर्न आणि बटाटय़ाने बनलेले चिप्स त्यांना खायला देईल.’ मीडिया फोटोग्राफर्सनी बहिष्कार टाकल्यामुळे आता सलमानने काही खासगी फोटोग्राफर्सची नेमणूक केली आहे.