Join us

अमृता सुभाषने स्वीकारले आव्हान

By admin | Updated: September 12, 2016 02:48 IST

अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे, तर बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ‘ती फुलराणी’ या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या

अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे, तर बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ‘ती फुलराणी’ या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता ‘मैं अ‍ॅल्बर्ट अ‍ॅनस्टान बनना चाहता हूँ’ या तिच्या आगामी चित्रपटात ती एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी अमृता सांगते, ‘‘आपल्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारत आहे. या स्त्रीला शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहितय. त्यामुळे आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी ती नेहमी प्रोत्साहन देते. तसंच नेहमीच त्याच्या पाठीशी उभी राहते. मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणं सोपे नाहीये. मी अभिनय करताना माझ्या भावना डोळ्यांच्या मदतीनं व्यक्त केल्या आहेत. या भूमिकेसाठी मला खूपच मेहनत घ्यावी लागली. माझ्यासाठी हे एक आव्हानच होतं; पण हे आव्हान मी चांगल्या रीतीने पेललं आहे, असं मला वाटतं.’’