Join us

अलका कुबल यांची लेक झाली पायलट!

By admin | Updated: June 6, 2017 18:05 IST

अनेक कलाकारांची मुले आपल्या आईवडलांप्रमाणेच सिनेमात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. पण यापैकी काही कलाकारांच्या मुलांनी मात्र

ऑनलाइन लोकमत  
मुंबई, दि. 6 - बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची मुले आपल्या आईवडलांप्रमाणेच सिनेमात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. त्यातील अनेकजण चांगले नावारूपासही आलेत. पण यापैकी काही कलाकारांच्या मुलांनी मात्र आपल्या आयुष्यात वेगळी वाट निवडली आहे. त्यापैकीच एक म्हणजे मराठीतील आघाडीच्या महिला कलाकार अलका कुबल-आठल्ये यांची कन्या ईशानी आठल्ये. 
 
अलका आणि समीर आठल्ये यांची कन्या असलेल्या ईशानीने कलाकार होण्यापेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न बाळगले.  तिने वैमानिक होण्याचे ठरवले. ईशानी हिने नुकतेच व्यावसायिक विमानाच्या वैमानिकाचा परवाना मिळवला आहे.  
दरम्यान, आपल्या मुलीने मिळवलेल्या यशामुळे अलका आठल्ये यांन खूप आनंद झाला आहे. लेकीने मिळवलेल्या यशाचे वर्णन करताना त्यांना शब्द अपुरे पडत आहेत. तिने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते. मध्ये मी तिला अन्य क्षेत्रात करिअर करायचे का असे विचारले. मात्र ती आपल्या ध्येयावर ठाम राहिली. अखेर आज तिला हे यश मिळाले, असे अलका कुबल-आठल्ये यांनी मुलीच्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.  
 
तर आपण स्वीकारलेल्या करिअरच्या वेगळ्या वाटेविषयी ईशानी म्हणाली, "मला आई-वडलांसारखे कलाकार व्हायचे नव्हते. तसेच चाकोरीबद्ध नोकरीही करायची नव्हती. त्यापेक्षा मला विमान आणि विमानतळावर काम करणाऱ्यांचे आकर्षण वाटायचे. त्यातूनच मी या क्षेत्रात आले." ईशानी हिने 2015 सालीच अमेरिकेत वैमानिकाचा परवाना मिळवला होता. मात्र भारतात यायचे असल्याने तिने येथे वैमानिकासंबंधीच्या परीक्षा देत तिने येथेही व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला.