आलिया भट्टला वयाच्या 32 व्या वर्षी लग्न करण्याची इच्छा आहे. त्याहीपुढे मुलांना जन्म देऊन त्यांची काळजी घेण्याचेही तिच्या मनात आहे. ती म्हणते, त्यानंतर मी हिरोईन म्हणून कमबॅक करण्याचा विचार करीन. यशस्वी झाले नाही, तर चित्रपटांची निर्माती बनेन.’ आलियाला कसे तरुण आवडतात, याबाबत ती स्पष्ट बोलत नाही; पण पंजाबी मुले जास्त आवडत असल्याचे ती म्हणते. आलियाचा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ नुकताच रिलीज झाला आहे.