बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला तिची आई सोनी राजदानसोबत काम करण्याची इच्छा आहे. अशा एखाद्या चित्रपटाची वडिल महेश भट्ट यांनी निर्मिती करावी, असे तिला वाटते. २००५ मध्ये आलेल्या सारांश या चित्रपटात सोनी राजदान यांनी काम केले होते. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री मीरा आणि अश्मित पटेल यांच्या नजर या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. सध्या आलिया तिच्या ‘हम्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
आलियाला करायचंय आईसोबत काम!
By admin | Updated: July 10, 2014 00:28 IST