Join us

मोहितच्या चित्रपटात आलिया

By admin | Updated: August 25, 2014 04:53 IST

लहानशा करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावणारी आलिया भट्ट लवकरच तिचा मामेभाऊ मोहित सुरीच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे

लहानशा करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावणारी आलिया भट्ट लवकरच तिचा मामेभाऊ मोहित सुरीच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. यासंदर्भात आलिया आणि मोहित यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या असल्याची बातमी आहे. तरुणांसोबत काम करणारा मोहित त्याच्या या बहिणीला गंभीर भूमिकेत सादर करण्याच्या विचारात आहे. आजवरच्या अनेक चित्रपटांत आलियाची इमेज बबली गर्लची आहे. त्यामुळेच तिची इमेज बदलण्याची मोहितची इच्छा आहे. मोहित लवकरच ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे, या चित्रपटात इमरान हाश्मी, विद्या बालन मुख्य भूमिकेत आहेत.