Join us

आलिया म्हणतेय, ‘जस्ट गो टू हेल दिल’

By admin | Updated: November 13, 2016 04:00 IST

शा हरुख खान, आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातील ‘जस्ट गो टू हेल दिल’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. ‘डिअर जिंदगी’मधील हे गाणे ब्रेकअप

शा हरुख खान, आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातील ‘जस्ट गो टू हेल दिल’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. ‘डिअर जिंदगी’मधील हे गाणे ब्रेकअप सॉन्ग असल्याचे भासते आहे. गाण्यात आलिया भट्ट रडताना दिसते आहे. फ्लॅशबॅकपासून ‘जस्ट गो टू हेल दिल’ या गाण्याची सुरुवात होते. यात आलिया ‘पिंक’ फेम अंगद बेदी सोबत दिसतेय. हार्ट-ब्रेक झालेल्या आलियाला प्रियकराचा विरह असह्य झाला आहे. त्यामुळेच कधीकधी तर हा राग आजूबाजूच्या वस्तूंवर काढतेय तर कधी खोटे खोटे हसतेय. शाहरुख खान या गाण्यात कुठेही नाही. यात केवळ आलियावर फोकस करण्यात आला आहे. सुनिधी चव्हाण व अमित आणि कसूर एमच्या आवाजात गायलेल्या या गाण्याला अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘डिअर जिंदगी’च्या गाण्याहून याचा अंदाज काही औरच आहे. यात कुणाल कपूरची महत्त्वाची भूमिका असून आलिया एका फोटोग्रॉफरच्या भूमिकेत दिसेल.