Join us

माझ्यामुळे ऐश्वर्या इतकी सुंदर !

By admin | Updated: October 17, 2016 19:59 IST

'फिल्मफेअर ग्लॅमर अॅंड स्टाइल' अवॉर्डसाठी बॉलिवुडच्या अनेक कलाकारंनी उपस्थिती लावली होती, मात्र सर्वात लक्षणीय होती ती म्हणजे ऐश्वर्या रॉय. रेड कार्पेटवर जेव्हा काळा गाऊन घालून ऐश्वर्या आली

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 17 - 'फिल्मफेअर ग्लॅमर अॅंड स्टाइल' अवॉर्डसाठी बॉलिवुडच्या अनेक कलाकारंनी उपस्थिती लावली होती, मात्र सर्वात लक्षणीय होती ती म्हणजे ऐश्वर्या रॉय. रेड कार्पेटवर जेव्हा काळा गाऊन घालून ऐश्वर्या आली तेव्हा सगळे अवाक झाले. 
 
चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' च्या या अभिनेत्रीचा मोस्ट ग्लॅमरस स्टार (महिला) या अवॉर्डने सन्मान करण्यात आला. यावेळी बॉलिवुडची सदाबहार अभिनेत्री रेखाच्या हस्ते ऐशला ट्रॉफी देण्यात आली.    
 
ऐशला ट्रॉफी देताना रेखा म्हणाली, 'जेव्हा ऐशची आई गर्भवती होती त्यावेळी ती  सारखा माझाच फोटो बघायची आणि बघा त्याचा निकाल तुमच्या समोर आहे'. केवळ मस्करी करावी म्हणून रेखा असं म्हणाली, आणि उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.