Join us  

कान्समधील ऐश्वर्या रायचा १५ वर्षाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 6:12 PM

२००२ मध्ये ऐश्वर्या रायला प्रथम कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटसाठी आमंत्रित आंमत्रण मिळाले होते. ऐश्वर्या राय बच्चन लॉरियल या ब्रँडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : परदेशात आयोजित केल्या जाणा-या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कान्स चित्रपट महोत्सवाचे एक वेगळे स्थान आहे. या महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाकडे मोठ्या आदराने पाहिले जाते, त्यामुळे या महोत्सवाचे आमंत्रण मिळणे ही आनंददायक बाब असते. त्यामुळेच २००२ मध्ये ऐश्वर्या रायला प्रथम कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटसाठी आमंत्रित आंमत्रण मिळाले होते. त्यामुळे तेंव्हा ती सगळ्यात मोठी बातमी ठरली होती. गेली १५ वर्षे ऐश्वर्या कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत आहे. ऐश्वर्या राय बच्चन लॉरियल या ब्रँडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते. यंदा तिने ओठांना उठावदार जांभळया रंगाचे लिपस्टिक लावले होते त्यामुळे ती अधिकच चर्चेत आली. कान्समधल्या ऐश्वर्याच्या या लूकची माध्यमांमध्यात चर्चेला उधान आले, खासकरुन टि्वटरवर हा चर्चेचा विषय ठरला होता. 
 
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा पोषाख नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतो. यावर्षीही ६९ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरतली आणि तिने अनेकांना घायाळ केले. नेहमीपेक्षा तिचा हा लूक एकदम वेगळा होता. मेकअपमध्येही ऐश्वर्याचे सौदर्य खुलून दिसते पण यावेळी ऐश्वर्याची लिपस्टिकच जास्त उठून दिसत होती. यावर टि्वटरवरुन वेगवेगळया प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.  तिच्या 'सरबजीत' या आगामी चित्रपटाचे कान्समध्ये स्क्रिनिंग झाले. अभिषेक आणि ऐश्वर्या २००७ मध्ये विवाहबद्ध झाले. अभिषेकने सोशल मिडीयावर ऐश्वर्याचा जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेला ड्रेस कुवेतच्या अली युनूसने डिझाईन केला होता. कान्सला उपस्थित रहाण्याचे ऐश्वर्याचे हे पंधरावे वर्ष आहे. 
 
 
गेल्या काही वर्षांपासून मल्लिका शेरावत, रिचा चड्डा सोनम कपूर या अभिनेत्री देखिल कान्स चित्रपट महोत्सवात वेगवेगळे रूप दाखवत आहे. २०१० मध्ये मल्लिकाने अजगर खांद्यावर खेळवत आणि त्याचे चुंबन घेत रेड कार्पेट एंट्री घेतली होती. ऐश्वर्यासह सोनम, मल्लिकाही आता कान्स चित्रपट महोत्सवाची नेहमीची सेलिब्रिटी झाली आहे. अश्या चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन करून आंतरराष्ट्रीय व्यवसाय करण्याचा विचार असतो. त्यामुळे या महोत्सवासाठी चित्रपटाची निवड व्हावी यासाठी भारतीय निर्माते प्रयत्न करत असतात.