Join us  

'ऐका दाजिबा' फेम ईशिता अरूण आहे सिनेइंडस्ट्रीपासून दूर, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 8:00 PM

ऐका दाजीबा फेम ही अभिनेत्री आता दिसते अशी, पहा तिचे फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गायक वैशाली सामंत हिच्या आवाजातील ऐका दाजिबा हे गाणं २००२ साली खूप लोकप्रिय झालं होतं. आजही हे गाणं बऱ्याचदा ऐकायला मिळतं. आजही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर परफॉर्मन्स पहायला मिळतो. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी झळकली आहे. मिलिंद गुणाजी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. मात्र इशिता सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

ईशिताने १९८२ साली वयाच्या तिसऱ्या वर्षी 'व्हीक्स कफ ड्रॉप्स'च्या जाहिरातीत काम केले होते. शाळेत शिकत असतानाच ईशिताने नादिरा बब्बर यांच्या अभिनय वर्कशॉपमधून अभिनयाचे धडे गिरवले होते.

सेंट झेविअर्स कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. श्याम बेनेगल यांच्या यात्रा मालिकेत तिला अभिनय करण्याची संधी मिळाली. इशिता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री,गायिका इला अरुण यांची लेक आहे.

सोनू निगमच्या मौसम या अल्बममध्ये ती दिसली. एका म्युझिकल शोचं सूत्रसंचालन केलं

ईशिता अरूण २००५ साली ध्रुव घाणेकरसोबत लग्नबेडीत अडकली.

ध्रुव घाणेकर हा बॉलिवूडचा गायक आहे. ध्रुव घाणेकर हा दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे.

गिरीश घाणेकर यांनी वाजवा रे वाजवा, रंगत संगत, नवसाचं पोर सारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या गोट्या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

 

टॅग्स :वैशाली सामंत