आलिया भट्ट वयाने खूप लहान आहे; पण या वयातही तिच्या फॅन्सची संख्या कोटींवर आहे. तिच्या चाहत्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, वयाच्या 11 व्या वर्षीच आलिया प्रेमात पडली होती. एखाद्या क्लासमेट किंवा समवयस्क मुलाच्या नव्हे, तर एका बॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात ती पडली होती. हा अभिनेता आहे शाहिद कपूर. विशेष म्हणजे आलिया आता त्याच शाहिदसोबत शानदार नावाच्या चित्रपटात काम करणार आहे. आलिया म्हणाली, ‘मी शाहिदची मोठी फॅन आहे. मी 11 वर्षाची होते तेव्हा त्याचा ‘इश्क विश्क’ हा चित्रपट पाहिला होता. मी तेव्हापासूनच त्याची मोठी फॅन बनले आहे. तो खूप चांगला अभिनेता आहे आणि दुस:याची मदतही करत असल्याचे मी ऐकले आहे.’