Join us  

सुशांत सिंग राजपुतनंतर Rhea Chakraborty पुन्हा पडली प्रेमात? या व्यक्तीसोबत झाली स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 11:01 AM

Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)च्या निधनाला अडीच वर्षे झाली आहेत. सुशांतच्या अचानक जाण्यानंतर त्याच्या आत्महत्येला गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती(Rhea Chakraborty)ला जबाबदार धरण्यात आले. सुशांतच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, रियाने सुशांतला कठीण काळात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. केवळ कुटुंबीयच नाही तर अभिनेत्याच्या चाहत्यांनीही रियाला जबाबदार ठरवले. या घटनेत रियाला तुरुंगात जावे लागले होते. पण रिया हळूहळू पूर्ववत आयुष्यात परतली आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. ती सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहच्या प्रेमात आहे.

रिया चक्रवर्ती तिचा कथित बॉयफ्रेंड बंटी सजदेहच्या घराबाहेर क्लिक झाली होती. यावेळी रिया बंटीच्या घरातून बाहेर पडताना दिसली. ही संपूर्ण घटना फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी रिया बंटीच्या घरातून बाहेर पडताना दिसली. रिया घरातून बाहेर आली आणि गाडीत बसली. ही संपूर्ण घटना छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रियाला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एकाने लिहिले, रियाला एक नवीन बळीचा बकरा सापडला आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, "ही मुलगी पूर्णपणे निर्लज्ज आहे.

सोहेल खानची माजी पत्नी सीमा सचदेहचा भाऊ बंटी याचा बॉलिवूडमध्ये खूप दबदबा आहे. तो मनोरंजन आणि क्रीडा व्यवस्थापनात काम करतो. यापूर्वी बंटीचे नाव सोनाक्षी सिन्हासोबत जोडले गेले होते. आता रियाचे नावही बंटीसोबत जोडले गेले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर जेव्हा रिया अचडणीत सापडली होती तेव्हा बंटीनेच मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले का..? हे येणारे काळच सांगेल.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत