अभिनेता संजय दत्तची कारागृहातून सुटका झाल्यानंतर ‘मुन्नाभाई-३’ बनविण्याचा निर्णय निर्माता विधू विनोद चोपडा याने घेतला आहे. यापूर्वी त्यांनी संजयला घेऊन ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या पार्श्वभूमीवर चोपडा म्हणाला की, संजय हा माझा अतिशय चांगला मित्र आहे. तो अतिशय सकारात्मक व्यक्ती आहे. कारागृहात ऐट पॅक्सअॅब्ज बनविल्याचे त्याने मला पत्राद्वारे कळविले आहे. तो जेलमधून बाहेर येताच आम्ही ‘मुन्नाभाई-३’चे काम हाती घेणार आहोत, असे चोपडाने सांगितले. आमिर खानच्या आगामी ‘पीके’ या चित्रपटातही संजय दिसणार आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
संजयच्या सुटकेनंतरच ‘मुन्नाभाई-३’
By admin | Updated: December 16, 2014 00:39 IST