Join us  

अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 1:38 PM

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. तर आणखी एका अभिनेत्याने दापोली येथे आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नसराई अगदी जोरदार सुरू आहे. अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे लोकप्रिय कपल नुकतच विवाहबद्ध झाले आहे. त्यांचे फोटो सध्या सोशल  मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे अभिनेता आशय कुलकर्णी(Aashay Kulkarni)सुद्धा लग्नबंधनात अडकला आहे. त्याची गर्लफ्रेंड सानिया गोडबोले (Sania Godbole)सोबत तो विवाहबद्ध झाला आहे. त्याचा लग्नसोहळा दापोली येथे पार पडला. त्याच्या लग्नाला विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सेलिब्रेटी जोडप्याने हजेरी लावली आहे. याशिवाय या दोघांच्याही जवळच्या मित्रमैत्रिणींनी तसेच नातेवाईकांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. 

अभिनेता आशय कुलकर्णीने त्याची दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी सानिया गोडबोले हिच्याशी आज म्हणजेच २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली आहे. अगदी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. मात्र मुंबई - पुणे नाही तर थेट कोकणात त्यांनी सात फेरे घेतले.  दापोली येथील निसर्गरम्य आणि समुद्र किनारी या दोघांचाही लग्नसोहळा पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

कोकणातील दापोलीत हा संपूर्ण सोहळा रंगला होता. दरम्यान आशय आणि सानिया गेले अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. सानिया ही अभिनेत्री नाही तर शास्त्रीय नृत्यांगना आहे. अनेक प्रकारचे डान्स फॉर्म्स तिला येतात. शिवाय ती नृत्य शिकवते सुद्धा. 

तर आशय कुलकर्णी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. माझा होशील ना, सुंदरी, पाहिले न मी तुला या मालिकेत तो झळकला आहे. लवकरच तो सोनाली कुलकर्णीसोबत 'व्हिक्टोरिया' सिनेमात झळकणार आहे. त्यासाठी त्याने लंडनमध्ये शूट केले आहे. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीविराजस कुलकर्णीशिवानी रांगोळे