Join us

अदनानला भारतीय होण्याची उत्सुकता

By admin | Updated: March 2, 2015 23:39 IST

पाकिस्तानी गायक अदनान सामीचे लिफ्ट करा दे हे गाणे भारतात लोकप्रिय झाले. त्यानंतर त्याच्या गाण्याची मागणी प्रचंड वाढली.

पाकिस्तानी गायक अदनान सामीचे लिफ्ट करा दे हे गाणे भारतात लोकप्रिय झाले. त्यानंतर त्याच्या गाण्याची मागणी प्रचंड वाढली. लोकप्रियता लक्षात घेऊन अदनानने भारतातच तळ ठोकला. पाकिस्तानी असलो तरी भारतीय नागरिक होण्याची आपली इच्छा असल्याचे त्याने नेहमीच म्हटले आहे. यापूर्वी अदनानने भारतीयत्वासाठी मागणी केली होती, मात्र केंद्रीय परराष्ट्रीय विभागाने फेटाळली. म्हणूनच अदनानाने पुन्हा नव्या उत्साहाने एकदा मला भारतीयत्व द्या, यासाठी शासनाकडे मागणी केली आहे.