Join us  

श्रद्धा कपूरमुळे भरपार्टीत आदित्य आणि फरहान भिडले

By admin | Published: April 05, 2017 2:42 PM

बॉलिवूडचे दोन अभिनेते आदित्य रॉय कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात जोरदार भांडण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - बॉलिवूडचे दोन अभिनेते आदित्य रॉय कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं वृत्त आहे. दोघांच्या भांडणाला कारणीभूत ठरली अभिनेत्री श्रद्धा कपूर. आदित्य आणि फरहान एकमेकांना शिवीगाळ देखील करत होते. इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रोनिकलने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीत ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. भट्ट यांच्या "विशेष फिल्म्स"ला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही पार्टी देण्यात आली होती. पार्टीमध्ये "आशिकी 2" या सिनेमातील कपल आदित्य आणि श्रद्धा हे होते. या पार्टीमध्ये फरहान अख्तर हा देखील होता. पार्टीमध्ये श्रद्धा आणि आदित्य बराच वेळ एकमेकांसोबत गप्पा मारताना आणि मस्ती करताना दिसत होते. काहींनी श्रद्धा आणि आदित्य चांगले कपल आहेत अशी कमेंटही केली. पण फरहान अख्तरला हे आवडलं नाही. त्यानंतर आदित्य आणि फरहानमध्ये जोरदार भांडण झालं, दोघांनी एकमेकांना शिवीगाळही केली. दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा श्रद्धाने प्रयत्नही केला होता, पण काही उपयोग झाला नाही.  याबाबत फरहानची समजूत काढण्यासाठी श्रद्धा कपूर फरहानच्या घरी देखील गेली होती.   
 
फरहान आणि श्रद्धा गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘रॉक ऑन 2’च्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. दोघांनी अधिकृतरीत्या याविषयी माहिती दिली नसली तरी त्यांची सलगी पाहून इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याविषयी कुजबूज सुरूच असते. 
काही महिन्यांपूर्वी ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी श्रद्धाच्या लिव्ह इन रिलेशनशिपमुळे संतापलेल्या तिच्या वडीलांनी म्हणजेच शक्ती कपूर यांनी तिला फरहानच्या घरातून खेचत बाहेर काढले होते. त्यानंतर श्रद्धा व तिच्या वडीलांमध्ये जोरदार भांडण देखील झाले मात्र तमाशा नको म्हणून श्रद्धा तिथून निघून गेली. शक्ती कपूर व श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे फरहानच्या वांद्र येथील घरी गेले होते. त्यांनी श्रद्धाला फरहान सोबत त्याच्या घरी न राहता स्वतःच्या घरी परतायला सांगितले. मात्र श्रद्धा ऐकत नाही बघून तिच्या वडीलांचा पारा चढला व त्यांनी हाताला धरुन खेचत श्रद्धाला घराच्या बाहेर काढले. फरहानच्या बिल्डिंगमध्ये राहणारे काही रहिवासी देखील हा प्रकार बघत होते त्यामुळे श्रद्धाने लगेच तेथून काढता पाय घेतला.
तर, आशिकी 2 च्या शूटिंगवेळी आदित्य आणि श्रद्धा दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.