Join us  

Adipurush : मराठी सिनेइंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं 'आदिपुरुष'मध्ये साकारली शूर्पणखाची भूमिका, पाहा कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:35 AM

Adipurush : प्रभास आणि क्रिती सनॉनचा बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) बाहुबलीच्या यशानंतर पॅन इंडिया स्टार बनला आहे. आता त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत आदिपुरुष (Adipurush) रिलीज झाला. या चित्रपटाची कथा पौराणिक कथेवर आधारीत आहे आणि व्हीएफएक्सवर कोट्यावधी रुपये खर्च केल्यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासने रामाची, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. ज्या प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे ते चित्रपटातील काही भूमिका पाहून थक्क झाले आहेत. आदिपुरुषमधील शूर्पणखेची भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं साकारली आहे. ही अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit). 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आदिपुरुषमध्ये शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. तिला या भूमिकेत पाहून चाहते अवाक झाले आहेत. या चित्रपटात तेजस्विनीसोबतच आणखी काही मराठी कलाकार आहे, ते म्हणजे देवदत्त नागे, नेहा खान. देवदत्त नागेनं आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्येही त्याचा लूक पाहायला मिळाला होता. मात्र तेजस्विनी पंडितची भूमिका प्रदर्शनापूर्वी कुठेच पाहायला मिळाली नव्हती. तिने आणि निर्मात्यांनी तिच्या भूमिकेबद्दल कमालिची गुप्तता पाळली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रमोशनच्या कार्यक्रमातही तिला पाहिले गेले नव्हते.

प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

'आदिपुरुष' आज प्रदर्शित  झाला असून चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. मात्र चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरुन प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. तसेच सैफ अली खाननेही रावणाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची निराशा केल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :आदिपुरूषतेजस्विनी पंडितप्रभासक्रिती सनॉनदेवदत्त नागे