Join us  

Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमा रिलीज, हनुमानासाठी एक सीट आरक्षित, हारफुलंही वाहिली; Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:00 AM

प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक सीट राखीव ठेवली जाईल असा निर्णय मेकर्सने घेतला होता.

ओम राऊत (Om RAUT) दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush)  सिनेमा रिलीज झाला आहे. प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहतच होते. पहिल्याच दिवशी सिनेमाची बंपर ओपनिंग होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनेमाचं तुफान अॅडव्हान्स बुकिंगही झालं होतं. तसंच प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक सीट राखीव ठेवली जाईल असा निर्णय मेकर्सने घेतला होता. आता त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

15 जून रोजी फिल्म रिलीज होण्याआधीच ट्विटरवर थिएटर मालकांनी एक फोटो शेअर केला. यामध्ये एका सीटवर हनुमानाची आणि राम सीतेची फ्रेम ठेवण्यात आली. याला हारफुलंही वाहण्यात आली. हा फोटो सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल झाला. आदिपुरुषच्या या निर्णयाचं कौतुकही केलं गेलं.

काही रिपोर्ट्सने हा दावा केला की हनुमानाच्या सीटच्या बाजूला बसायचं असेल तर त्याची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. मात्र मेकर्सने ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंच. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं. 

'आदिपुरुष' आज रिलीज झाला असून सिनेमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र सिनेमाच्या व्हीएफएक्सवरुन प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सैफ अली खाननेही रावणाच्या भूमिकेत निराश केल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :आदिपुरूषदेवदत्त नागेप्रभासक्रिती सनॉन