Join us  

'जलेगी तेरे बाप की...' हनुमानाच्या तोंडी असे डायलॉग? लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, 'वाल्मिकी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 10:14 AM

मी ज्या गावातून येतो तिथे माझ्या आजींनी अशाच भाषेत...

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाला रिलीज होताच ट्रोलिंगचा आणि प्रेक्षकांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की' असे 'छपरी' शब्द जे आजच्या काळात वापरले जातात ते डायलॉग सिनेमात चक्क रामभक्त हनुमानाच्या तोंडी वापरले गेले आहेत. तो सीन पाहून सर्वांचाच पारा चढला आहे. आता आदिपुरुषवर होत असलेल्या टीकेवरुन ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

संवाद लेखक मनोज मुंतशीर, सध्या वृत्तवाहिन्यांवर येत आपलं म्हणणं मांडत आहेत. तशाप्रकारचे संवाद का लिहिले यावर ते म्हणाले, 'ते संवाद मुद्दामूनच लिहिले आहेत. जर ट्रोलिंग होतच आहे तर मग ते फक्त हनुमानाच्या संवादांवरच का, श्रीराम आणि सीतेच्या संवादांवर पण आक्षेप घ्या. हनुमानाच्या संवादांना आम्ही खूप साध्या सरळ पद्धतीने मांडले आहे.सर्वच पात्रांच्या भाषेत फरक असलाच पाहिजे. रामायण ही एक कथा आहे आणि ती गावागावात वेगवेगळ्या भाषेत सांगितली जाते. मी ज्या गावातून येतो तिथे माझ्या आजींनी अशाच भाषेत रामायण सांगितले. या देशातील मोठमोठे संत, कथावाचक अशाच भाषेत बोलतात जसे हनुमानाचे ते संवाद आहेत. मी पहिलाच माणूस नाही ज्याने असे डायलॉग लिहिले आहेत, हे आधीपासूनच वापरले जात आहेत.'

तर आणखी एका मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले, 'अनेक लोक सिनेमाला सुरुवातीपासूनच ट्रोल करत आहेत. हा आदिपुरुष आहे. यामध्ये आजच्या पिढीला समजेल अशा भाषेचा वापर केला आहे. आम्ही कधीच असं सांगितलं नाही की सिनेमात वाल्मिकींसारखी भाषा असेल. तसं असतं तर चित्रपट संस्कृतमध्ये बनवावा लागला असता. मला संस्कृत येत नाही.'

'आदिपुरुष' १६ जून रोजी रिलीज झाला. सिनेमाला प्रचंड ट्रोल केले जात असले तरी कमाईबाबतीत सिनेमाने रेकॉर्ड तोडला आहे. 500 ते 600 कोटी बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने पहिल्याच दिवशी 90 कोटींचा  गल्ला जमवला. तर दोनच दिवसात सिनेमाने 100 कोटी पार केले आहेत. 

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनदेवदत्त नागेट्रोल