Join us  

अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स काय? व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:52 AM

अभिनेत्री स्पृहा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

मराठी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी तिच्या गोड स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकत असते. अभिनेत्री स्पृहा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करत  पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

स्पृहा जोशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने कॅप्शनमध्ये लिहले, 'पुढील पाच वर्षांसाठी माझे प्लॅन्स…'. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सांगते की,  मला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सबद्दल जेव्हा कोणी विचारलं, तर मी दिसायला आणखी हॉट होईन. आणखी विचित्रपणा करेन. आणखी श्रीमंत होईन आणि आणखी भयानक होईन. शिवाय आणखी अनपेक्षितही होईन'. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिय दिल्या आहेत. 

स्पृहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती हिंदी चित्रपटात झळकली आहे.  ‘सब मोह माया है’ असं या हिंदी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात तिने अभिनेता शर्मन जोशीच्या पत्नीची भूमिका निभावली. तसेच 'संकर्षण व्हाया स्पृहा' लाही रसिक प्रेक्षक भरभरून दाद देत आहेत. अभिनयासह स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवयित्रीदेखील आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रामध्ये स्पृहाचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अलिकडेच स्पृहा लोकमान्य या मालिकेत झळकली होती. परंतु, नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

टॅग्स :स्पृहा जोशीसेलिब्रिटीमराठी अभिनेता