Join us  

Poonam Pandey : मी जिवंत आहे! पूनम पांडे स्वतः समोर आली; हे नाटक का केलं तेही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 12:30 PM

Poonam Pandey's Fake Demise : पूनम पांडेनेच स्वत: समोर येत ती जिवंत असल्याचं सांगितलं आहे.

मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाल्याची बातमी शुक्रवारी समोर आली होती. ३२ वर्षीय मॉडेलच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण, पूनम पांडेच्या निधनाबद्दल शंका व्यक्त केली जात होती. आता खुद्द पूनम पांडेनेच स्वत: समोर येत ती जिवंत असल्याचं सांगितलं आहे. पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत तिचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने झाला नसल्याचं सांगितलं आहे.  कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे नाटक केल्याचं पूनमने व्हिडिओत म्हटलं आहे. 

या व्हिडिओमध्ये पूनम म्हणते, "मी जिवंत आहे. माझा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने झालेला नाही. पण, दुर्देवाने हजारो महिलांना सर्व्हायकल कॅन्सरने जीव गमवावा लागला आहे. कारण, त्यांना माहित नसतं की काय करायचं. पण, हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त तुम्हाला काही टेस्ट करून HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे महिलांना प्राण गमावू लागू नये म्हणून आपल्याला एकत्रित येऊन हे करायला हवं." 

पूनम पांडेने सर्व्हायकल कॅन्सर आणि त्याच्या जनजागृतीसाठी (https://www.poonampandeyisalive.com/) ही वेबसाइटही लॉन्च केली आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, पूनम पांडेने २०१३ साली नशा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती झळकली. पूनम अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकली होती. आता यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. 

टॅग्स :पूनम पांडेसेलिब्रिटीकर्करोगकॅन्सर जनजागृती