मुंबईः बहुचर्चित अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोहेल खानच्या लग्नाबाबतच्या प्रश्वावर अखेर अभिनेत्री हुमा कुरेशी हिनं अखेर मौन सोडलं आहे. सोहेलला हे प्रेम संबंध गुपित ठेवायचे होते. मात्र हुमा कुरेशीनं हे प्रेमसंबंध खुले केले आहेत. आणि त्यावर भाष्यही केलं आहे.
हुमा कुरेशीनं हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आमच्या प्रेम प्रकरणाची चर्चा करून मीडिया माझं कामावरून लक्ष विचलित करू पाहत असल्याचा आरोप केला आहे. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या प्रत्येक स्त्रीला इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करावा लागत असल्याचंही यावेळी हुमानं सांगितलं आहे.
प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वाचं श्रेय तिच्या जवळच्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न होत असतो. यातून लोकांना कर्तृत्ववान स्त्रीला लक्ष्य करणं सोपं जात असल्याचं अभिनेत्री हुमा कुरेशीनं म्हटलं आहे.