Join us  

अभिनेत्री एमी जॅक्सनने ठरलेले लग्न केले पोस्टपोन, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 8:00 PM

ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती.  

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मौसम आला आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. याच यादीत एमी जॅक्सनचेही नाव सामिल होते.  ब्वॉयफ्रेंड आणि ब्रिटिशचा मल्टी मिलेनियर जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबत याचवर्षी ग्रीसमध्ये ती लग्न करणार होती. ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती.  ‘१ जानेवारी २०१९, एका नव्या प्रवासाचा शुभारंभ...आय लव्ह यू. मला जगातील सर्वात नशिबवान मुलगी बनवण्यासाठी आभार...’, असे एमीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. शिवाय या पोस्टमध्ये अंगठीचा इमोकॉनही शेअर केला  होता.मात्र आता एमी जॅक्सनचे लग्न हे काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे समजतंय. 

 या वर्षी होणारे लग्न आता पुढच्या वर्षी 2020 होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्न पुढे ढकलण्याचे कारणही थोडे आश्चर्यकारक आहे. लग्न करण्यासाठी सुंदर बीचच्या शोधात हे कपल आहे. जेव्हा दोघांना त्यांच्या आवडीनुसार बीच मिळेल तेव्हा ते लग्न करतील अशा चर्चा सुरू आहेत. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली. 

एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात २०१२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.   एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये  तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते. नुकताच एमीचा ‘2.0’ हा सिनेमा रिलीज झालो. या चित्रपटात ती मेगास्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली.मात्र मी कोणालाही डेट करत नसल्याचे स्पष्टीकरण तिने एका मुलाखतीत दिले होते.  

टॅग्स :एमी जॅक्सन