रांझणा, तन्नु वेड्स मन्नु रिर्टन्स, नील बट्टे सन्नाटा सारखे शानदार चित्रपट केल्यानंतर स्वरा भास्कर एक चरित्र अभिनेत्री म्हणून उदयास आली. आपल्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपली जागा व नवीन ओळखदेखील निर्माण केली आहे. प्रेम रतन धन पायो मध्ये सलमानच्या बहिणीची भूमिका केल्यानंतर तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. आता स्वरा भास्कर एक नवीन चित्रपट साइन करणार आहे, ज्यात ती सेक्स वर्करची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे त्यात स्वराचा खूपच बोल्ड लूक असणार आहे. चित्रपटाची कथा आदित्य कृरलानीची ह्यटिकली एंड लक्ष्मी बॉम्बह्ण वर आधारित असेल. जानेवारीपासून रियल लोकेशनवर शूटिंग सुरू होईल.
...आता सेक्स वर्कर बनणार ही अभिनेत्री !
By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST