एकीकडे दुष्काळी परिस्थिती असतानादेखील राजकारणी मोठ्या थाटामाटात मुलांचे विवाह लावत असल्याची चर्चा असताना, दुसरीक डे मात्र अभिनेत्री स्वरांगी मराठे हिने मात्र अगदी राजेशाही थाट न मानता अगदी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेऊन एक सामाजिक आदर्श समोर ठेवला आहे. स्वरांगी हिचा विवाह ठाण्याचे निखिल काळे यांच्याशी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. हे दोघे विवाहासाठी खर्च होणारी रक्कम वनवासी कल्याण आश्रम व सांगीतिक संस्थेला देणार आहेत. स्वरांगीचे ‘आभाळमाया’ या मालिकेतील चिंगी हे पात्र विशेष लोकप्रिय झाले होते. त्याहीपेक्षा सुपरहिट ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या मैत्रिणीच्या भूमिकेतदेखील ती झळकली. चला तर देऊ या स्वरांगी व निखिल यांना लग्नासाठी शुभेच्छा.
अभिनेत्री स्वरांगी मराठेने ठेवला सामाजिक आदर्श
By admin | Updated: January 17, 2016 03:08 IST