Join us  

अभिनेता लोकेश गुप्तेची पत्नी आहे ही कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 7:00 AM

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या फॅमिलीबाबत देखील जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेता आणि दिग्दर्शक लोकेश गुप्तेच्याबाबत सांगणार आहोत.

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे लोकेश आणि त्याच्या पत्नीची. अभिनेता लोकेश विजय गुप्तेनं मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून स्वतःचा ठसा उमवटलेला आहे. या सर्व माध्यमातून बरीच वर्षं काम केल्यानंतर आता लोकेशनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. लोकेशची पत्नीदेखील कलाविश्वात सक्रिय असून ती मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. लोकेश पत्नीचं नाव चैत्राली गुप्ते असं तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ऋणानूबंध, विरोधी, स्वप्नांच्या पलीकडले, पिया अलबेला अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलंय.

 चैत्रालीची बहिण भार्गवी सुद्धा अभिनेत्री आहे. सध्या ती आई मायेचं कवचं या मालिकेत काम करतेय.  मोलकरीणबाई, वहिनीसाहेब अशा मालिकांमधून तर संदूक, वन रुम किचन अशा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं . भार्गवी एक कुशल नृत्यांगना सुध्दा आहे. तिने सेलिब्रिटी नृत्याच्या रिएलिटी शोचं विजेतेपदही पटकावलंय.

टॅग्स :भार्गवी चिरमुलेसेलिब्रिटी