Join us  

मुलगी झाली हो ! करणवीर बोहरा दुसऱ्यांदा बनला बाबा; शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 1:03 PM

काल करणवीर हॉस्पीटलबाहेर हॅपी डान्स करताना दिसला होता. त्याच्या हॅपी डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

ठळक मुद्देकरणवीर आणि तीजे 2006 साली लग्न बेडीत अडकले. 2016 साली त्यांना जुळ्या मुली झाल्या.

टीव्ही अभिनेता करणवीर बोहराच्या दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. करणवीरची पत्नी तीजे सिद्धू हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  या दोघांना आधी जुळ्या मुली आहेत. 2016 मध्ये त्यांच्या बेला आणि व्हिएना या दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला होता. यावर्षी आॅगस्टमध्ये करणवीरने पत्नीच्या प्रेग्नंसीची माहिती दिली होती.  कॅनडामधील व्हॅनकॉवर या ठिकाणी तीजेने मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर करणवीर आनंद साजरा करताना दिसला.  तिन्ही मुलींसोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत करणवीरने आनंद व्यक्त केला.

‘मला किती आनंद होतोय हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी आता तीन मुलींचा पिता आहे आणि यापेक्षा सुंदर आयुष्य असूच शकत नाही. माझ्या आयुष्यातील या सर्व परींसाठी देवा तुझे खूप खूप आभार. माझ्या लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती,’ असे त्याने म्हटले आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीतही करणवीरने आपल्या तिन्ही मुलींचा उल्लेख लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती असा केला आहे.

काल करणवीर हॉस्पीटलबाहेर हॅपी डान्स करताना दिसला होता. त्याच्या हॅपी डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.करणवीर आणि तीजे 2006 साली लग्न बेडीत अडकले. 2016 साली त्यांना जुळ्या मुली झाल्या.  करणने क्यों की साँस भी कभी बहू थी, शरारत, कसौटी जिंदगी की, नागिन 2 या मालिकेत काम केले आहे. याशिवाय तो खतरों के खिलाडी, बिग बॉस 12 या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाला होता.

टॅग्स :करणवीर बोहरा