Join us

ऐश्वर्याला भेटायला घरी पोहोचली अभिषेकची EX गर्लफ्रेंड

By admin | Updated: March 26, 2017 14:43 IST

दुःखाच्या क्षणी एखाद्याची साथ देणं महत्वाचं मानलं जातं, मात्र अशावेळी एकमेकांना शत्रू मानणारे खूप कमी लोकं जवळ येतात.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 - दुःखाच्या क्षणी एखाद्याची साथ देणं महत्वाचं मानलं जातं, मात्र अशावेळी एकमेकांना शत्रू मानणारे खूप कमी लोकं जवळ येतात. नुकतंच बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींबाबत अशीच घटना घडली. 
 
काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे ऐश्वर्या रायच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी ऐश्वर्याची भेट घेतली. शाहरूख खान ते ऋषी कपूरपर्यंत अनेकजण ऐश्वर्याच्या घरी पोहोचले होते.    
 
यादरम्यान, अभिषेकची आधीची गर्लफ्रेंड ऐश्वर्याला भेटायला येईल याचा कोणी विचारही केला नव्हता. आपल्या सासरी परतल्यानंतर ऐश्वर्याची भेट घेण्यासाठी राणी मुखर्जी आली होती. ऐश्वर्या आणि राणीचे संबंध चांगले नाहीत हे सगळ्यांनाच माहितीये. त्याचं कारण आहे अभिषेक आणि राणी यांचं अनेक वर्ष चाललेलं अफेअर. दोघं लग्न करणार असल्याचीही चर्चा होती पण काही कारणास्तव ते फिसकटलं.