Join us  

सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली'तून श्रेयस तळपदेचा पत्ता कट, मेहुणा आयुष शर्माची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 3:28 PM

Salman Khan's Kabhi Eid Kabhi Diwali Movie : सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)चा आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली'( Kabhi Eid Kabhi Diwali Movie)च्या रिलीजची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधीत मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटातून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अर्शद वारसी(Arshad Warsi)चा पत्ता कट करण्यात आला आहे आणि त्यांच्या जागी सलमान खाननेआयुष शर्मा (Aayush Sharma)आणि झहीर इकबाल (Zaheer Iqbal)ला घेतल्याचे समजते आहे. 

फरहाद सामजी यांच्या या चित्रपटात आता सलमान खानसोबत आयुष शर्मा आणि झहीर इकबाल त्याच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पूजा हेगडे सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार वेंकटेश प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सुरूवातीला आयुषने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता कारण हा रोल अंतिम चित्रपटातील त्याच्या भूमिकेइतका मोठा नव्हता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आयुषने या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाशिवाय सलमान खान टायगर ३ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिल २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानही पाहुणा कलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सलमान खानश्रेयस तळपदेआयुष शर्माअर्शद वारसी