Join us  

'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान व जॅकी चॅनची जोडी

By admin | Published: May 15, 2015 11:34 AM

चीन व भारताच्या संयुक्त निर्मितीतून 'कुंग फू योगा' हा चित्रपट साकारला जाणार असून या चित्रपटात आमीर खान व जॅकी चॅन ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे.

ऑनलाइन लोकमत 
बीजिंग, दि. १५ - भारत व चीनमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असतानाच आता बॉलीवूड व चीनमधील सिनेसृष्टीतही 'हिंदी चीन भाई भाई'चे वारे वाहू लागले आहे. चीन व भारताच्या संयुक्त निर्मितीतून 'कुंग फू योगा' हा चित्रपट साकारला जाणार असून या चित्रपटात आमीर खान व जॅकी चॅन ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौ-यावर असून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तर दुसरीकडे आमीर खानचा पीके हा चित्रपटही चीनमधील प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी आमीरही चीनमध्ये गेला आहे. आमीर खान हा चीनमध्ये बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहे. तर अ‍ॅक्शन हिरो जॅकी चॅन हा भारतात चांगलाच लोकप्रिय आहे.  हाच दुवा हेरुन भारत - चीनने संयुक्तरित्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. 'कुंग फू योगा' असे या चित्रपटाचे नाव असेल व यात चिनी मार्शल आर्ट्स व भारतीय संस्कृतीचा मिलाप बघायला मिळणार आहे. आमीर व जॅकी चॅन ही जोडी प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार असल्याने आत्तापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.