Join us  

"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 12:29 PM

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ज्यात त्यांनी माणसांच्या दिसण्यावर त्यांना ज्या टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागतं त्यावर भाष्य केलंय (milind gawali, aai kuthe kay karte)

मिलिंद गवळींंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. यात त्यांनी वर्णभेदावर भाष्य केलंय. ज्यात ते लिहितात, “मी कसा दिसतोय ?” किंवा “मी कशी दिसते आहे ?”हा प्रश्न आपल्या कानावर अनेक वेळा पडत असतो किंवा हा प्रश्न आपण सुद्धा अनेकदा लोकांना विचारत असतो, मी मात्र हा प्रश्न विचारण्याचं अनेक वर्षापासून बंद केले, कारण मी “beauty lies in the eyes of the beholder “ मध्ये believe करायला लागलोय !"

मिलिंद पुढे लिहितात, "बरेच वेळेला लोकांमद्धे self belief नसेल तर त्यांना हा प्रश्न नेहमी पडतच असतो, लहानपणी शाळेत किंवा नातेवाईकांनी किंवा घरातल्यांनी जर मुलांमध्ये complex create असेल, तर आयुष्यभर त्या मुलाला किंवा त्या मुलीला हा प्रश्न पडतो, काही काही मुलाचा किंवा मुलींचा प्रश्न असा असतो की “मी बरा दिसतोय ना ?”, म्हणजे मी चांगला कधी दिसतच नाही हे मनामध्ये त्यांनी बिंबवून टाकलेलं असतं, किंवा अजून एक प्रकारची लोक असतात जी “नाही नाही मला फोटो काढून घ्यायचा नाही माझे फोटो चांगले येत नाहीत !” ते कधी फोटोला उभे राहत नाही किंवा पूर्वी फोटो फाडून टाकायची एक पद्धत होती , "की photo चांगला आला नाहीये आणि तो फाडून टाक."

 मिलिंद पुढे लिहितात, "मी माझ्या आईचा खूप आभारी आहे की तिन्हे मला हा inferiority complex कधी येऊ दिला नाही, नाहीतर आमच्या शाळेमध्ये इतकी अवली मुलं होती, आणि नातेवाईक पण फार काही कमी बाराचे नव्हते , “हिचा मुलगा किंवा मुलगी सावळाच सावळीच आहे, नकटाच आहे नकटीच किंवा मग बुटकाच बुटकीच आहे, “ते बिचारे पोरगं हिलच्या चपला काही घालायचे, सोलचे बूट काय घालायचे , गोरं होण्यासाठी फेर&लवली काय लावायचे"

मिलिंद शेवटी लिहितात, "पण मला असं वाटतं की अंतरिक सौंदर्य हे खूप महत्त्वाचं असतं, if you can feel beautiful, you are beautiful, If you feel happy, you will look beautiful. If you can be joyful, your face will radiate and you bound to be beautiful.एक गोष्ट ,मला असं वाटतं , प्रत्येकानी लक्षात घ्यायला हवी की आपण unique आहोत, अख्या जगामध्ये असा दुसरा piece शोधून सापडणारच नाही, There is nobody like you in the entire world, you are unique and different than anyone else you can imagine. So you are beautiful, Just believe in yourself."

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामराठीमराठी अभिनेता