टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा मनोरंजन जगतातील व्यावसायिक असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा आत्महत्या केवळ हिंदी टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच मर्यादित नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही असेच काहीसे घडत आहे. याबाबतच्या एका अध्ययनात काही चकीत करणारे तथ्य समोर आलेले आहेत. या अध्ययनानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आत्महत्या करणाऱ्या टीव्हीशी जुळलेल्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अहवालानुसार मागील एक दशक, म्हणजे दहा वर्षांत जगातील वेगवेगळ्या देशात आत्महत्या करणाऱ्या टीव्ही कलाकारांची संख्या ३५ पर्यंत पोहोचली आहे. या ध्ययनानुसार, कलाकारांच्या जीवनातील प्रेम प्रसंगात अपयश, आर्थिक अडचण हे आत्महत्यांचे प्रमुख कारण आहे. भारताचा विचार केला, तर येथेही वातावरण ठीक नाही. प्रत्युषाच्या आधी या दोन वर्षांत दहा असे प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात टीव्हीशी जुळलेल्या कलाकारांनी आपले जीवन संपविले आहे. टीव्ही कलाकार कुलजीत रंधावानेही असेच आत्मघातकी पाऊल उचलले. मागील वर्षी टीव्ही मालिका ‘लापतागंज’ मध्ये काम करणारी अभिनेत्री रामजी शांडिल्यने आर्थिक समस्यांवरून आपले जीवन संपविले होते. फक्त मुंबईच नव्हे, दुसऱ्या शहरातही टीव्ही कलाकारांच्या आत्महत्यांचे प्रकरण समोर आले आहेत. तामिळनाडू टेलीव्हिजनचे प्रसिद्ध निवेदक साईं प्रसादने आत्महत्या केली. त्याच्या मागील वर्षी कन्नड टीव्ही अभिनेत्री श्रुतीने बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली,तर गेल्या वर्षीच कोलकाता येथे बंगाली टीव्ही अभिनेत्री दिशा गांगुलीने आत्महत्या केली. तिकडे चेन्नईमध्ये टीव्ही अभिनेत्री वैष्णवी आणि के निर्दोषाने आपले जीवन संपविले.
गेल्या दशकात जगभरातील ३५ टीव्ही कलावंतांची आत्महत्या
By admin | Updated: April 7, 2016 01:02 IST