Join us

सनी लिऑन विरोधात १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा खटला

By admin | Updated: April 4, 2016 20:30 IST

बिग बॉस सीझन पाचमधील स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्राने अभिनेत्री सनी लिऑन विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - बिग बॉस सीझन पाचमधील स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्राने अभिनेत्री सनी लिऑन विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यामध्ये पूजाने सनीवर बदनामी केल्याचा आरोप केला असून, तिच्याकडून नुकसानभरपाईपोटी १०० कोटी रुपये मागितले आहेत. 
 
न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी आले त्यावेळी पूजा तिथे उपस्थित नव्हती. बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये मी लोकप्रिय स्पर्धक होते. सनीचा एंट्री शो मध्ये नंतर झाली. सनी माझ्यावर जळायची तिच्या मनात माझ्याबद्दल आकस होता. त्यामुळे तिने काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलखतीतून माझी बदनामी केली असा आरोप पूजाने केला आहे. 
 
यापूर्वी पूजाने सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पुनम सिन्हावर आरोप केले होते. सोनाक्षी आणि पुनम यांना माझी हत्या करायची आहे असे आरोप पूजा मिश्राने केले होते. आयपीसीच्या कलमातंर्गत सनी विरोधात कारवाई सुरु करावी अशी पूजाने मागणी केली आहे. उच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर जून २०१६ मध्ये न्यायालयासमोर पुन्हा हे प्रकरण सुनावणीसाठी येईल.