Join us

Zerodha Brokerage on F&O : Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:34 IST

Zerodha News: जर तुम्ही भारतातील सर्वात मोठं ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधाद्वारे ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ नितीन कामत यांनी ब्रोकरेज चार्जेससंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

Zerodha News: जर तुम्ही भारतातील सर्वात मोठं ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधाद्वारे (Zerodha Trading) ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ नितीन कामत यांनी ब्रोकरेज चार्जेससंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ब्रोकरेज चार्जेसमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सद्वारे त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. झिरोधामध्ये इक्विटी डिलिव्हरी मोफत असेल. सध्या आम्ही आपल्या ब्रोकरेजमध्ये कोणताही बदल करणार नसल्याचं त्यांनी नमूद केलंय.

आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून ऑप्शन अँड फ्युचर चार्जेस अॅडजस्ट केले जाणार आहेत, अशातच हे वृत्त समोर आलंय. ऑप्शन ट्रेडिंगसाठी सिक्युरिटिज ट्रान्झॅक्शन टॅक्स ०.०६२५ टक्क्यांवरून ०.१ टक्के करण्यात आलाय. तर ट्रान्झॅक्शन चार्ज ०.०३५ टक्के करण्यात आलाय. 

जुलैमध्ये आलेलं सर्क्युलर

१ जुलै २०२४ रोजी बाजार नियामक सेबीनं एक परिपत्रक जारी केलं. या परिपत्रकात मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्सना (एमआयआय) ट्रेडिंग व्हॉल्यूमवर आधारित स्लॅबनिहाय फी स्ट्रक्चर लागू न करण्यास सांगण्यात आलं होतं. त्याऐवजी समान शुल्क रचना लागू करण्यास सांगण्यात आलं. या परिपत्रकाच्या आधारे शेअर बाजारांनी शुल्क आकारलं आहे. एमआयआयबद्दल बोलायचं झालं तर यात स्टॉक एक्स्चेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीजचा समावेश आहे.

टॅग्स :शेअर बाजारनितीन कामथ