Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडर्सना दुहेरी फटका! जेरोधाचे ब्रोकरेज दुप्पट, तर १ एप्रिलपासून 'STT' सुद्धा महागणार; पाहा काय बदलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:26 IST

Zerodha Trading Charges Hike: दिग्गज ब्रोकरेज प्लॅटफॉर्म 'Zerodha' ने ब्रोकरेज शुल्कात वाढ जाहीर केली आहे. हा नवीन नियम सर्व गुंतवणूकदारांना लागू होणार नाही.

Zerodha Trading Charges Hike : शेअर बाजारातील रिटेल गुंतवणूकदार आणि इंट्राडे ट्रेडर्ससाठी १ एप्रिलपासूनचा काळ खडतर असणार आहे. देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी असलेल्या 'जेरोधा'ने आपल्या ब्रोकरेज शुल्कात मोठी वाढ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, याच दिवसापासून केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पातील वाढीव 'एसटीटी' कर देखील लागू होणार आहे. यामुळे 'कमी भांडवलात जास्त जोखीम' घेणाऱ्या ट्रेडर्सच्या नफ्याला आता मोठी कात्री लागणार आहे.

ब्रोकरेज २० रुपयांवरून थेट ४० रुपये!

  • आतापर्यंत जेरोधा इंट्राडे ट्रेडिंगसाठी प्रति ऑर्डर २० रुपये ब्रोकरेज आकारत असे. मात्र, १ एप्रिलपासून हे शुल्क ४० रुपये करण्यात आले आहे. पण, ही वाढ सरसकट सर्वांसाठी नाही.
  • जे ट्रेडर्स सेबीच्या कॅश कोलेटरल नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांनाच हे दुप्पट ब्रोकरेज द्यावे लागेल.
  • नियम काय सांगतो? सेबीच्या नियमानुसार, कोणत्याही इंट्राडे पोझिशनसाठी ट्रेडरच्या एकूण मार्जिनपैकी किमान ५०% हिस्सा रोख रक्कमेत किंवा लिक्विड फंडाच्या स्वरूपात असणे अनिवार्य आहे. उर्वरित ५०% हिस्सा हा शेअर्सच्या स्वरूपात ठेवता येतो.

नितिन कामथ यांनी स्पष्ट केले कारणजेरोधाचे सीईओ नितिन कामथ यांच्या मते, "क्लायंट्सकडून मार्जिन ट्रेडिंगसाठी ठेवल्या जाणाऱ्या कोलेटरलमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचा फंडिंग खर्च वाढला आहे. पारदर्शकता जपण्यासाठी आम्ही टक्केवारीमध्ये शुल्क न वाढवता, केवळ ५०% रोख मार्जिनची कमतरता असणाऱ्या ट्रेडर्ससाठी ब्रोकरेज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे."

'STT' चाही दणकाकेवळ ब्रोकरेजच नाही, तर सरकारचा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स देखील १ एप्रिलपासून महागणार आहे.

विभाग जुना STT नवीन STT (१ एप्रिलपासून) 
फ्युचर्स ०.०२% ०.०५% 
ऑप्शन्स प्रीमियम०.१०% ०.१५% 

या दरवाढीमुळे ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांच्या व्यवहाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

वाचा - ३५ व्या वर्षी गुंतवणूक, ५५ व्या वर्षी २ कोटींचे मालक! म्युच्युअल फंडात कितीची SIP करावी लागेल?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Zerodha brokerage doubles, STT increases: Traders face double whammy!

Web Summary : Zerodha doubled brokerage for non-compliant traders. STT also rises April 1st impacting intraday traders. Futures STT increases from 0.02% to 0.05%, Options premium from 0.10% to 0.15%.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटनिर्देशांकनिफ्टीकर