Join us

World Cup दरम्यान 'या' कंपन्या देणार बंपर रिटर्न्स; गुंतवणूकीची संधी सोडू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 17:37 IST

ICC WorldCup सुरू होण्यास फक्त दोन दिवस बाकी आहेत, अशावेळी गुंतवणूकीची संधी सोडू नका.

World Cup 2023: यंदा भारतात वनडे विश्वचषक होत आहे. भारताने एकट्याने विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 5 ऑक्टोबरपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. याचा परिणाम अनेक क्षेत्र आणि कंपन्यांच्या व्यवसायावर होणार आहे. यामध्ये हॉटेल्स, एअरलाइन्स, रेस्टॉरंट्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या काळात गुंतवणूकदारांनाही प्रचंड नफा मिळू शकतो.

विश्वचषकादरम्यान हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ट्रॅव्हल आणि एअरलाइन्स कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढेल. शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत, ज्यांच्या नफ्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

या क्षेत्रांना अधिक फायदा होईलविश्वचषकादरम्यान, क्विक सेवा रेस्टॉरंट क्षेत्रात चांगली मागणी दिसून येईल. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह सांगतात की, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सध्या तेजी आहे. प्रवासात वाढ झाल्यामुळे एअरलाइन्स उद्योगालादेखील महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. G20 शिखर परिषद आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांमुळे या सर्व विभागांमध्ये वाढ झाली आहे.

सणासुदीचा हंगाम आणि क्रिकेट विश्वचषक आणि त्यानंतर लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने या सर्व क्षेत्रांना दीर्घकाळ फायदा होणार आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करू शकतात.

या कंपन्यांचे स्टॉक मोठी कमाई करतीलया क्षेत्रातील कंपन्यांवर नजर टाकली तर इंडियन हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेल्स, 'ताज' ब्रँडची हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांना खूप फायदा होईल. याशिवाय, क्विक सेवा रेस्टॉरंट विभागात, वेस्टलाइफ फूड वर्ल्ड, ज्युबिलंट फूडवर्क्स, रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया इत्यादींच्या शेअर्सवर लक्ष ठेवता येईल. पेप्सी बॉटलिंग कंपनी वरुण बेव्हरेजेसचे शेअर्सही चांगली कमाई करुन देऊ शकतात.

प्रवासी विभागातील इंडिगो आणि आयआरसीटीसीच्या शेअर्सवरही लक्ष ठेवा. प्रवासात वाढ झाल्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या कमाईत चालू तिमाहीत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय, तुम्ही इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवरही लक्ष केंद्रित करू शकता.

डिस्क्लेमर- (आम्ही तुम्हाला शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपऑफ द फिल्डशेअर बाजारशेअर बाजार