Join us

आज विप्रोच्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर; एक्स बोनस टेडवर ट्रेड करणार स्टॉक, बोनस शेअर्स मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:04 IST

Wipro Bonus Share : शेअर बाजारातील विप्रोच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचं बारीक लक्ष राहणार आहे. खरं तर आज विप्रोचे शेअर्स बोनस इश्यू एक्स डेटवर ट्रेड करतील.

Wipro Bonus Share : शेअर बाजारातीलविप्रोच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचं बारीक लक्ष राहणार आहे. खरं तर आज विप्रोचे शेअर्स बोनस इश्यू एक्स डेटवर ट्रेड करतील. गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आयटी कंपनीनं ऑक्टोबरमध्ये आपल्या भागधारकांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती, ज्याची रेकॉर्ड डेट ३ डिसेंबर आहे. १:१ बोनस इश्यूचा अर्थ असा आहे की कंपनी आपल्या शेअर होल्डरकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी १ शेअर विनामूल्य देईल. मात्र, त्यांच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. 

१ शेअर मिळणार फ्री

ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, विप्रोनं चालू कॅलेंडर वर्षात आपल्या भागधारकांना ६ बोनस शेअर्स जारी केले आहेत. शेअरहोल्डर्सना त्यांच्या मंजुरीसाठी पोस्टल बॅलेटद्वारे १:१ या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्याची शिफारस करण्यात आली आहे, म्हणजेच सर्व ऑल ड्यू इक्विटी शेअर्ससाठी प्रत्येकी २ रुपयांचा एक बोनस इक्विटी शेअर जारी केला जाईल, अस कंपनीन एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.

तिमाही निकाल कसा?

विप्रोचा निव्वळ नफा आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २१ टक्क्यांनी वाढून ३,२०९ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत २,६४६ कोटी रुपये होता. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला कामकाजातून मिळालेलं उत्पन्न २२,३०२ कोटी रुपये होतं, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीतील २२,५१६ कोटी रुपयांच्या तुलनेत थोडं कमी आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :विप्रोशेअर बाजार