Join us
Daily Top 2Weekly Top 5

फेडरल रिझर्व्हच्या धास्तीने बाजार गारठला! गुंतवणूकदार सावध; 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:38 IST

Share Market : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुनही शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली.

Share Market : भारतीयशेअर बाजारात आज (मंगळवार) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्यामुळे बाजारातील नकारात्मक वातावरण कायम राहिले. बीएसई सेन्सेक्स ४३६.४१ अंकांनी मोठ्या घसरणीसह ८४,६६६.२८ अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्सही १२०.९० अंकांनी घसरून २५,८३९.६५ अंकांवर स्थिरावला. सोमवारीही बाजारात मोठी घसरण झाली होती. काल सेन्सेक्स ६०९.६८ अंकांनी, तर निफ्टी २२५.९० अंकांनी तुटला होता.

घसरणीचे मुख्य कारणबाजार तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार १० डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांची घोषणा होण्यापूर्वी अत्यंत सावधगिरीने व्यवहार करत आहेत. यामुळे विक्रीचा दबाव कायम आहे.

सेन्सेक्स-निफ्टीतील सर्वाधिक नुकसानमंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ८ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर बंद झाले, तर उर्वरित २२ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणीवर बंद झाले. निफ्टी ५० मधीलही केवळ १७ कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर ३३ कंपन्यांना नुकसान झाले. सेंसेक्सच्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६१% ची मोठी घसरण नोंदवली गेली. तर एटरनलचे शेअर्स २.३०% वाढीसह बंद झाले.

तेजीमध्ये असलेले शेअर्स

  • टायटन : २.१२%
  • अदानी पोर्ट्स : १.०७%
  • बीईएल : ०.८२%
  • भारतीय स्टेट बँक : ०.४०%

मोठी घसरण झालेले शेअर्स

  • टेक महिंद्रा : १.९९%
  • एचसीएल टेक : १.७८%
  • टाटा स्टील : १.७४%
  • मारुती सुझुकी : १.१६%
  • सन फार्मा : १.०५%
  • आयसीआयसीआय बँक : १.०४%

वाचा - 'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात

रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही ०.५% ते ०.९% पर्यंत घट झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Federal Reserve Fears Freeze Market; Investors Cautious, Sector Sees Biggest Drop

Web Summary : Indian stock market declined for the second day due to Federal Reserve anxieties. Investors are cautious. BSE Sensex fell 436.41 points, Nifty 50 dropped 120.90 points. Asian Paints saw the biggest decline while Titan and Adani Ports gained.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी