Stock Market News Updates : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा गुरुवार (८ जानेवारी) अत्यंत निराशाजनक ठरला. सलग घसरणीचा सामना करणाऱ्या बाजारात आज विक्रीचा मोठा दबाव पाहायला मिळाला. गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे सेन्सेक्स ७३० अंकांनी कोसळला, तर निफ्टी २२२ अंकांनी खाली आला. केवळ प्रमुख निर्देशांकच नाही, तर आतापर्यंत तग धरून असलेल्या 'बँक निफ्टी'मध्येही मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.
सकाळच्या सत्रापासूनच पडझडबाजाराची सुरुवातच आज कमकुवत झाली. निफ्टी ३४ अंकांच्या घसरणीसह २६,१०६ वर उघडला, तर सेन्सेक्स १८३ अंकांनी घसरून ८४,७७८ वर उघडला. मात्र, दुपारच्या सत्रात विक्रीचा वेग इतका वाढला की सेन्सेक्स ८४ हजार आणि निफ्टी २६ हजारांच्या खाली जाण्याची भीती निर्माण झाली.
'बँक निफ्टी'ला ६० हजारांचा अडथळाबँक निफ्टीने आज व्यवहारादरम्यान ६०,११२ अंकांचा उच्चांक गाठला होता. मात्र, बाजारातील सार्वत्रिक विक्रीमुळे बँकिंग शेअर्समध्येही घसरण झाली आणि हा निर्देशांक ६० हजारांच्या खाली ५९,५६४ वर स्थिरावला. रिअल्टी, ऑटो आणि ऑईल अँड गॅस यांसारख्या इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनाही मंदीने ग्रासले.
२,५०० हून अधिक शेअर्स 'लाल' निशाणीतएनएसईवरील आकडेवारीनुसार, आज एकूण ३,१३८ शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी तब्बल २,५६९ शेअर्सचे भाव कोसळले, तर केवळ ४९३ शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर्स लाल निशाणीत बंद झाले. केवळ इटरनल, बेल, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स आणि एचसीएल टेक या ५ कंपन्यांनी थोडीफार तेजी दाखवत हिरव्या निशाणीत स्थान मिळवले.
बाजारात भूकंप का आला?
- परदेशी गुंतवणूकदारांची माघार: भारतीय बाजारातून पैसे काढून इतर स्वस्त बाजारपेठांकडे वळण्याची परदेशी गुंतवणूकदारांची स्पर्धा अद्यापही सुरूच आहे.
- रशियावर निर्बंधांची भीती: रशियावर अमेरिकेकडून अधिक कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता असल्याने जागतिक अनिश्चितता वाढली आहे.
- कमोडिटीच्या किमतीत घट: जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमतीत झालेली घटही बाजारासाठी नकारात्मक ठरली.
- जियोपॉलिटिकल तणाव: जगातील विविध भागांत सुरू असलेल्या युद्धाच्या आणि संघर्षाच्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारात अस्थिरता आहे.
- जागतिक शेअर बाजारातील मंदी: अमेरिकन आणि आशियाई बाजारांमधील पडझडीचे पडसाद भारतीय बाजारातही उमटले.
वाचा - १ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
काय म्हणतात तज्ज्ञ?
तज्ज्ञांच्या मते, "ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' निर्णयाला अमेरिकन सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले आहे, त्या निकालावर भारतीय बाजाराचे भवितव्य अवलंबून असेल. याशिवाय, भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबामुळेही गुंतवणूकदार हताश आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना इतर देशांचे बाजार सध्या भारताच्या तुलनेत स्वस्त वाटत असल्याने ते येथे खरेदी करण्यास उत्सुक नाहीत."
Web Summary : Indian stock market faced a disappointing Thursday with continuous decline. Sensex plunged by 730 points, Nifty fell by 222. Foreign investors withdrawing, Russia sanctions fear, commodity price drop, geopolitical tensions, and global market slump contributed to the downturn.
Web Summary : भारतीय शेयर बाजार को लगातार गिरावट के साथ निराशाजनक गुरुवार का सामना करना पड़ा। सेंसेक्स 730 अंक गिरा, निफ्टी 222 अंक गिरा। विदेशी निवेशकों की निकासी, रूस पर प्रतिबंध का डर, कमोडिटी की कीमतों में गिरावट, भू-राजनीतिक तनाव और वैश्विक बाजार में गिरावट का योगदान रहा।