Gold Silver Rate : सराफा बाजारात सध्या 'वास्तव' आणि 'अपेक्षा' यांचा खेळ सुरू असून गुंतवणुकीचे सर्व पारंपरिक अंदाज फोल ठरत आहेत. गुरुवारी मिळालेला किंचित दिलासा शुक्रवारी सकाळी एका मोठ्या धक्क्यात रूपांतरित झाला. जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ५,४०० रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, चांदीने सर्व विक्रम मोडीत काढत एकाच दिवसात १५,००० रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली आहे.
दिल्ली आणि मुंबईतील आजचे ताजे दरगुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आज सोन्याचे दर नव्या शिखरावर पोहोचले आहेत.
- २४ कॅरेट सोने (शुद्ध) : १,५९,८६० रुपये (प्रति १० ग्रॅम)
- २२ कॅरेट सोने (दागिने) : १,४६,५५० रुपये (प्रति १० ग्रॅम)
- १८ कॅरेट सोने : १,१९,९३० रुपये (प्रति १० ग्रॅम)
- चांदी: ३,४०,००० रुपये (प्रति किलो)
या 'भयंकर' दरवाढीमागची कारणे काय?बाजार तज्ज्ञांच्या मते, २०२६ च्या सुरुवातीला शेअर बाजारात सुरू असलेल्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी 'सेफ हेवन' मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळतात. भू-राजकीय तणाव आणि डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीला पाठबळ मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून एका मर्यादित कक्षेत असलेला सोन्याचा भाव आता सर्व अडथळे तोडून बाहेर पडला आहे.
मिडल क्लासच्या आवाक्याबाहेर 'मौल्यवान' धातूचांदी आता ३४० रुपये प्रति ग्रॅम या दराने विकली जात आहे, जे मध्यमवर्गीयांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. लग्नसराईचा हंगाम जोरात असताना दागिन्यांची खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. मात्र, ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली होती, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आता मोठी नफावसुली पाहायला मिळत आहे.
Web Summary : Gold prices surged ₹5,400 per 10 grams, while silver skyrocketed ₹15,000 per kg. Market turmoil and global factors drove the increase, making precious metals less accessible for the middle class amidst the wedding season.
Web Summary : सोने की कीमतों में ₹5,400 प्रति 10 ग्राम की वृद्धि हुई, जबकि चांदी ₹15,000 प्रति किलो बढ़ी। बाजार की उथल-पुथल और वैश्विक कारकों ने कीमती धातुओं को मध्यम वर्ग के लिए कम सुलभ बना दिया।