Reliance Jio IPO: रिलायन्स जिओचा आयपीओ (IPO) चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत येऊ शकतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये रिलायन्स जिओच्या लिस्टिंगबाबत माहिती दिली होती. अनेक गुंतवणूक बँकर्सच्या मते रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे व्हॅल्युएशन १३० अब्ज डॉलर ते १७० अब्ज डॉलरच्या दरम्यान असू शकते. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स ग्रुप आयपीओच्या माध्यमातून २.५० टक्के हिस्सा कमी करण्याचा विचार करत आहे. जर असं झालं, तर आयपीओच्या इतिहासातील हा सर्वात मोठा इश्यू ठरू शकतो.
रिलायन्स जिओ आयपीओचा जीएमपी किती?
Bigul च्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ९३ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करू शकतो. यावरून आयपीओबाबत बाहेर कशा प्रकारची चर्चा सुरू आहे हे दिसून येते.
₹२४ वरुन ₹१४०० वर पोहोचला हा शेअर; मल्टिबॅगर स्टॉकनं ४ वर्षांत दिला ६४ लाखांचा रिटर्न
काय असू शकतो प्राईस बँड?
बोनान्झाशी (Bonanza) संबंधित अभिनव तिवारी रिलायन्स जिओ आयपीओच्या प्राईस बँडवर म्हणतात, "असं मानलं जात आहे की कंपनीचं व्हॅल्युएशन १३० अब्ज ते १७० अब्ज डॉलरच्या दरम्यान असू शकतं. अशा परिस्थितीत कंपनी किरकोळ गुंतवणूकदारांना १५ टक्के ते २० टक्के सवलत देऊ शकते. जर असं झालं, तर रिलायन्स जिओ आयपीओचा प्राईस बँड १,०४८ रुपये ते १,४५७ रुपये असू शकतो. मात्र, बरेच काही व्हॅल्युएशनवरही अवलंबून असेल."
रिलायन्स जिओ आयपीओ व्हॅल्युएशन
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, इनव्हेस्टमेंट बँक जेफरीजनं नोव्हेंबर २०२५ मध्ये रिलायन्स जिओचं व्हॅल्युएशन १८० अब्ज डॉलर असू शकतं असं म्हटलं आहे. या व्हॅल्युएशनवर जर प्रवर्तकांनी २.५ टक्के हिस्सा कमी केला, तर आयपीओच्या माध्यमातून साधारण ४.५ अब्ज डॉलर उभारले जाऊ शकतात. जे ह्युंदाई मोटर इंडिया आयपीओच्या ३.३ अब्ज डॉलरच्या तुलनेत कितीतरी पटीनं जास्त आहे. मात्र, इतर अनेक गुंतवणूक बँकर्स १३० अब्ज डॉलर ते १७० अब्ज डॉलर इतकं व्हॅल्युएशन वर्तवत आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Reliance Jio's IPO is expected in the first half of the year. Valuations range from $130 to $170 billion. The IPO might offer a 15-20% discount to retail investors, potentially pricing shares between ₹1,048 and ₹1,457. GMP is ₹93.
Web Summary : Reliance Jio का IPO इस साल की पहली छमाही में आने की उम्मीद है। मूल्यांकन $130 से $170 बिलियन तक है। IPO खुदरा निवेशकों को 15-20% छूट दे सकता है, जिससे शेयरों की कीमत ₹1,048 और ₹1,457 के बीच हो सकती है। जीएमपी ₹93 है।